Sabudanyachi khichadi / साबुदाण्याची खिचडी / उपवासाची / UPVAS
साहित्य :
१) २ वाट्या साबुदाणा.
२) १ वाटी शेंगदाण्याचा कुट.
३) १ बटाटा.
४) ५-६ हिरव्या मिरच्या.
५) मीठ.
६) अर्धा चमचा साखर.
७) २ मोठे चमचे तूप.
८) २ मोठे चमचे खवलेला नारळ.
९) थोडीशी कोथिंबीर.
१०) अर्धा चमचा जिरे.
कृती:-
साबुदाणा खिचडी करण्या पूर्वी साबुदाणा निदान दोन तास आधी धूऊन तो मुरण्या इतके पाणी ठेऊन भिजवावा. दोन तासांनी तो बोटांनी दाबून पाहिल्यावर तो पिठूळ झाला व ओलसर लागला नाही, कि तो मुरला आहे असे समजावे.
या भिजलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचे कुट, मीठ व साखर टाकावी. हे मिश्रण हाताने एकत्र करावे. २ मोठे चमचे तूप काढईत घालावे. त्यात जीऱ्याची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे व बटाट्याच्या पातळ फोडी टाकून थोडे परतावे.नंतर वरती झाकण ठेऊन मंद आचेवर वाफ येऊ द्यावी.
बटाटे शिजले कि त्यात साबुदाणा घालून ७-८ मिनिटे हलवावे, वरून खवलेला नारळ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
टीप:- खिचडी साजूक तुपात केल्यास खूप स्वादिष्ट आणि खमंग होते.